कत्तलीसाठी आणलेल्या २६ गोवंश पशुधनाची पोलिसांकडून सुटका

Foto
११ लाख ६९ हजारांचा मुद्देमालही केला जप्त

गंगापूर, (प्रतिनिधी) : शहरात कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल २६ गोवंश जनावरांची पोलिसांनी सुटका करत चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ११ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.३१) रात्री ८.४५ वाजता बिट अंमलदार अमित पाटील, पो. ना. विठ्ठल जाधव, पो. अं. वैभव नागरे, पो. अं. विष्णु बापते व त्यांच्या सहकाऱ्यांचा पथक गंगापूर शहरात गस्त घालत असताना लासूर नाका परिसरात गुप्त माहिती मिळाली की ख्वाजानगर भागात एका घराजवळ टेम्पोत गोवंश कत्तलीसाठी ठेवले आहेत.

यानंतर गंगापूर पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत रात्री ८.४५ वाजता धाड टाकली. घटनास्थळी अशोक लेलंड कंपनीचा ङ्गदोस्तफ टेम्पो (क्र. एमएच १२ केपी १९७१) आढळून आला. तिथेच उभ्या असलेल्या इसमाने आपले नाव अयाज नुरअहमद कुरेशी (वय २७, रा. ख्वाजानगर) असे सांगितले.

तपासात वाहनात दोन बैल, तर शेजारील बंदिस्त जागेत आठ गाई व गो-हे विना अन्नपाणी कत्तलीसाठी डांबून ठेवलेले आढळले. गंगापूर पोलिसांनी पुढील तपासात अयाज कुरेशीने या जनावरांचा मालकी हक्क नदीम कुरेशी
पोलिसांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल  : 
यांयाविरुद्ध पोउनि झोरे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर पोलिसांचा पुढील तपास सुरु :
या कारवाईत गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांचे बिट अंमलदार अमित पाटील, पो. ना. विठ्ठल जाधव, पो.अं. वैभव नागरे, पो. अं. विष्णू बापते व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास बिट अंमलदार अमित पाटील करीत आहेत.

(रा. नेवासा) याच्यासोबत असल्याचे कबूल केले. तसेच मोसीन कुरेशी व अफसर कुरेशी (दोघे रा. गंगापूर) यांनी शेजारील खळ्यात आणखी १६ गोवंश डांबून ठेवल्याची माहिती मिळाल्याने तेथूनही जनावरे ताब्यात घेण्यात आली.